बँकेत पैसे मोजत असलेल्या महिलेचा विश्वास संपादन करुन ३३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यास केले अटक.

बँकेत पैसे मोजत असलेल्या महिलेचा विश्वास संपादन करुन ३३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यास केले अटक.

 

पुणे : प्रतिनिधी :सतीश जाधव. दिनांक २५ रोजी फिर्यादी रा. आहेरगाव निफाड पिंपळ गांव नाशिक ग्रामीण व त्यांचे पती हे शेतीकामासाठी पैसे आवश्यक असल्याने पिंपळगाव येथील बँकेत जावुन खात्यामुधून रुपये एक लाख रुपये) काढुन तेथेच बँकेमध्ये मोजत असताना एक अनोळखी इसमाने यातील एक नोट खोटी आहे असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन तेहतीस हजार रुपये काढून घेवून फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून त्यांनी पिंपळगाव बसवंत नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध सुरु असताना गुन्हे शाखा युनिट १, चे पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार बाबा दांगडे, संतोष अनुसे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पाहिजे अरोपी नामे नामे जॉन हुसेन परवेज ईराणी वय ४८ वर्षे, रा. विष्णू कृपा नगर, इराणी मज्जिद, शिवाजीनगर पुणे. हा सध्या त्याचे रहाते घरी आल्याची बातमी मिळताच सदरबाबत खात्री करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, युनिट १, यांनी दिले. मिळालेल्या माहितीची पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे खात्री केली असता सदर इसम हा पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन बातमीतील वर्णनाप्रमाणे इसम मिळून आल्याने त्यास दिनांक ६रोजी ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कायदेशीर कारवाईकामी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन,नाशिक ग्रामीण यांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्‍्त,गुन्हे शाखा पुणे गौहर हसन, सहा पोलीस आयुक्त गुन्हे -१ .शैलेश संखे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक .दिपक लगड, यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत,पोलीस अंमलदार बाबा दांगडे,संतोष अनुसे, प्रमोद जगताप,आशिष खरात, अतुल साळवे,उमेश शेलार,रेवनाथ भुजबळ यांनी केली.

मुख्य संपादक सतीश जाधव

सतीश जाधव हे जन महाराष्ट्र 24 न्यूज चे मुख्य संपादक आहेत. निष्पक्ष, निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सामाजिक, राजकीय आणि स्थानिक घडामोडींना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते कार्यरत आहेत. लोकशाही मूल्ये, पत्रकारितेची नैतिकता आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून ते संपादकीय जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *