दिवाळीआधी मेट्रोची गोड बातमी! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

- माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याचा मुहूर्त पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर लांबणीवर पडला होता. आता या सेवेचे पुढील महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीआधी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येणार असून, त्या वेळी त्यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविला जाण्याची शक्यता आहे


